|Thursday, June 27, 2019
You are here: Home » उद्योग » ऍपलकडून कॅशबॅक पेमेन्ट कार्ड, न्यूज प्लस-टीव्हीचे सादरीकरण

ऍपलकडून कॅशबॅक पेमेन्ट कार्ड, न्यूज प्लस-टीव्हीचे सादरीकरण 

या सेवा सप्टेंबरनंतर 100 देशात उपलब्ध करुन देणार

वृत्तसंस्था/ लिफोर्निया

ऍपलकडून ग्राहकांसाठी नियमित अनेक वेगवेगळय़ा सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असते. कंपनीने सोमवारी रात्री उशिरा ‘ऍपल पे ऍपल कार्ड, ऍपल टीव्ही आणि न्यूज प्लस’चे सादरीकरण स्टीव्ह जॉब्स सभागृहात ऍपलच्या एका कार्यक्रमात करण्यात आले असून आम्ही आमच्या नवीन उत्पादनामधून ग्राहकांना वर्ल्ड क्लास सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सीईओ कुक यांनी यावेळी म्हटले आहे.

ऍपलच्या पाच सेवा

 ऍपल पे

ऍपल पे या सेवेची सुरुवात अमेरिकेतील पोर्टलॅन्ड शहरातून करण्यात येणार आहे ग्राहकाला आपल्या आयफोनच्या माध्यमातून साईन अप करावे लागेल. त्यामध्ये त्याला सॉफ्टवेअर व्हर्जन मिळेल व त्यानंतर ग्राहक या सेवेचा लाभ घेऊ शकतो. या सेवेच्या आधारे ग्राहक आपला व्यवहार अन्य व्यक्तीसोबत अगदी आरामदायी करु शकतो. यासाठी एका विशिष्ट कार्डची निर्मिती करण्यात आलेली आहे. परंतु हे वॉलेट आपण वापरणाऱया ऍपच्या आतमध्येच असणार असल्याची माहिती ऍपल पेच्या अध्यक्षा जेनिफर बॅली यांनी यावेळी सांगितले आहे.

 ऍपल कार्ड

ऍपलने एक अनोखे पेडिट कार्डचे सादरीकरण केले आहे. त्यात फक्त ग्राहकाचे नाव लिहलेले असणार आहे. तर कोणताही नंबर, सीवीवी कोड, एक्सपायरी मुदत आणि ग्राहकांची सही अशा प्रकारचा कोणताही उल्लेख या कार्डवर नसणार आहे. या कार्डचा वापर जगभरातील ऍपल पे ची सुविधा असणाऱया ठिकाणी वापरता येणार असल्याचे म्हटले आहे.

 ऍपल टीव्ही, टीव्ही पल्स

नवीन ऍपलचा टीव्ही नेटफ्लिक्सहून अत्याधुनिक सोय असणारा ऍपल टीव्हीचे सादरीकरण करण्यात आले आहे. त्याच्या किंमती आणि उपलब्धी सप्टेबर 2019नंतर जवळपास100 देशात करण्यात येणार आहे. ऍपलच्या टीव्हीवरील जाहिराती मोफत असणार आहेत.

ऍपल आर्केड

हा आयफोन आणि आयपॅड गेम्ससाठी सप्टेंबरनंतर सुविधा सुरु करण्यात येणार आहे. यात 100 हून अधिक नवीन गेम्स असणार आहेत. यावर कोणत्याही जाहिराती नसणार आहेत.

ऍपल न्यूज ऍप नं1

ऍपलचे न्यूज ऍप जगात भारी असून ते आता न्यूज प्लसमध्ये अनेक अत्याधुनिक सोय उपलब्ध करुन देण्यात येणार असून यात जागतिक स्तरावरील 300 सर्वोच्च मॅग्जीनमधील माहितीचा खजाना वाचकांना वाचण्यास मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

ऍपल न्यूज प्लस

न्यूज प्लसवर मॅगझीनवर जवळपास 8000 डॉलर्स नोंदणी फि आहे परंतु ऍपल ऍप्लिकेशनच्या आधारे ही सेवा 9.99 डॉलर्सला देण्यात येणार आहे. वॉशिंग्टन पोस्ट आणि न्यूयॉर्क टाईम्सने यात करार केला नाही आहे.