|Thursday, June 27, 2019
You are here: Home » उद्योग » ऊबर-करीम यांच्यात लवकरच व्यवहार

ऊबर-करीम यांच्यात लवकरच व्यवहार 

वृत्तसंस्था/ मुंबई

कॅबची सेवा देण्यात कार्यरत असणारी पश्चिम आशियातील ऊबर कंपनी करीम कंपनीसोबत लवकरच अधिग्रहण करणार असल्याची घोषणा दोन्ही कंपन्यांकडून करण्यात आली आहे. सदरचा व्यवहार हा 3.1 अब्ज डॉलर्समध्ये होणार  असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. करीम आणि ऊबर हे हात मिळवणी करुन आपला व्यवसाय विस्तार करण्यास वेगळी योजना तयार करण्यात येणार असल्याचा अंदाज मांडण्यात येत आहे. सध्याच्या व्यवहारानंतर करीम- ऊबर ही पूर्ण हक्क असणारी कंपनी म्हणून भविष्यात कारभार सांभाळणर आहे. व्यवहाराची रक्कम काही रोख व अन्य मार्गानी देण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.