|Thursday, June 27, 2019
You are here: Home » उद्योग » रिलायन्स,स्टेट बँक-आयसीआयसीआय कामगिरीने तेजी

रिलायन्स,स्टेट बँक-आयसीआयसीआय कामगिरीने तेजी 

सेन्सेक्स 425 अंकानी मजबूत : निफ्टी 11,450 च्या वरती

मुंबई :

सलग दोन सत्रांतील घसरणीनंतर मंगळवारी भारतीय बाजारात (बीएसई) सेन्सेक्समध्ये 425 अंकानी मजबूत होत 38,000चा टप्पा गाठण्यात यशस्वी झाला. राष्ट्रीय शअर बाजारात(एनएसई) निफ्टीत ही तेजी नोंदवत 11,450 च्या वरती जात बंद झाला. दिवसभरातील व्यवहारात रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँक याची सकारात्मक झालेली कामगिरी आणि आंतरराष्ट्रीय घडामोडीतील सकारात्मक संपेताचा फायदा घेण्यात बीएसईला यश मिळाले आहेत.

चालू सप्ताहातील बाजाराला सोमवारी समाधानकारक कामगिरी करता आली नाही. त्यात बीएसईमध्ये देशी संस्थामधील शेअर्सची खरेदी करण्यात वर्चस्व राखले होते. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर वर्चस्व ठेवण्यात अपयश आल्याने बाजारात घसरण झाली होती. तर या उलट मंगळवारी शेअर बाजारात रुपया डॉलरच्या तूलनेत 19 पैशांनी मजबूती नोंदवत 68.77 मूल्यावर स्थिरावला.

दिवसभरतील व्यवहारात गुंतवणूकदारांनी योग्य गुंतवणुक केली. दुपारपर्यंत काही प्रमाणात दबावात वावरणारा बाजार शेवटच्या सत्रात वधारत बंद झाला. झालेल्या व्यवहारातून सेन्सेक्स आणि निफ्टीत वरची पातळी गाठली. मुख्य बीएसई सेन्सेक्समध्ये दुपारी दरम्यान झालेल्या व्यवहरातून सेन्सेक्सने 38,297,70 अंकानी उसळी घेतली. आणि हीच बाजार बंद होताना 425 अंकाची तेजी नोंदवत 38,233.41 वर बंद झाला. निफ्टी 129 अंकानी वधारत 11,495 च्या वरती जात बंद झाला. तर मागील दोन सत्रातील सेन्सेक्स निर्देशांकात 575 अंकानी नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली. लोकसभा निवडणूकाच्या वातावरणामुळे आगामी काही दिवस भारतीय बाजारात चढउतराचे वातावरण राहणार असल्याची मते शेअर बाजारातील अभ्यासकांकडून नोंदवण्यात येत आहेत.