|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शरीफ यांना जामीन मंजूर, विदेश प्रवासावर मात्र बंदी

शरीफ यांना जामीन मंजूर, विदेश प्रवासावर मात्र बंदी 

इस्लामाबाद  :

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना मंगळवारी वैद्यकीय आधारावर 6 आठवडय़ांच्या कालावधीचा जामीन मंजूर केला आहे. जामिनाच्या कालावधीत नवाज शरीफ यांना देश सोडता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सरन्यायाधीश आसिफ सईद खोसा यांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यीय खंडपीठाने याप्रकरणी सुनावणी केली आहे. यापूर्वी नवाज यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात 6 मार्च रोजी याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने वैद्यकीय आधारावर त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. अल अजीजिला स्टील प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरणी 69 वर्षी शरीफ हे डिसेंबर 2018 पासून लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात कैद होते.