|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » लिंगनूर (कापशी)-दाजीपूर रस्त्यावरील वृक्षांची कत्तल

लिंगनूर (कापशी)-दाजीपूर रस्त्यावरील वृक्षांची कत्तल 

प्रतिनिधी/ सेनापती कापशी 

लिंगनूर (कापशी) ते मुदाळ तिट्टा-दाजीपूर या 178 क्रमाकांच्या राज्यमार्गाच्या रस्त्याचे काम सध्या जोरात सुरु झाले आहे. हा रस्ता रुंदीकरणासह मजबुतीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रति कि. मी. 2 कोटी 91 लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तेवढी तरतूदही केली आहे. मात्र हा रस्ता करत असताना या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱया व अनेक वर्षांची साक्ष देणाऱया वृक्षांची कत्तल केली जात आहे.

गेली अनेक दिवस हा रस्ता होणार होणार अशी चर्चा होती. त्यामुळे या रस्त्यावर कोणताच निधी मंजूर झाला नव्हता. कोकणला जोडणारा हा मुख्य रस्त्या असल्याने प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता रस्त्यामध्ये प्रचंड खड्डे गेल्या दोन वर्षात पडले होते. मात्र हा रस्ता दुरुस्त झालेला नव्हता. आता या रस्त्यासाठी मोठा निधी मंजूर झाला आहे. त्याचे कामही सध्या युध्दपातळीवर सुरु आहे. कर्नाटक शासनाने महाराष्ट्र हद्दीपर्यंत गतवर्षी अतिशय दर्जेदार रस्ता केला आहे. त्या रस्त्याच्या तोडीचा हा रस्ता व्हावा यासाठी इतके चांगले मजबतीकरण करण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. सध्या लिंगनूर -कापशी पासून एका बाजूने पूर्ण रस्ता उकरुन त्यामध्ये नव्याने भर टाकून नवीन रस्ता तयार करण्यात येत आहे. सध्या हा रस्ता 7 मीटर रुंदीकरणाने असणार आहे. 7 मीटर रुंदीकरणाने असणारा हा रस्ता आता साडे दहा मीटर रुंदीकरणाने केला जाणार आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुतर्फा गेल्या अनेक वर्षांपासून असणारे वृक्ष धडाधड कोसळत आहेत. भल्या मोठा मशिनरी लावल्याने  कांही क्षणात वृक्षांचे होत्याचे नव्हते होते.

या रस्त्याच्या मोऱयांची उभारणी सुरु आहे. तर लिंगनूर पासून एका बाजूने रस्ता उकरण्याचे काम सुरु आहे. रस्त्याची सध्या चाळण झाली असून रस्त्यामध्ये अनेक खड्डे आहेत. त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास होतो. त्यामुळे कांही ठिकाणी पॅचवर्क करण्याचे कामही सुरु आहे. संबंधित कंपनीने एका बाजूने रस्ता सुरळीत करुन प्रवाशांची सोय व्हावी अशा पध्दतीने नियोजन केले आहे. रस्त्याच्या भरावासाठी मोठमोठी दगड, मुरुम वापरण्यात येत आहे. सध्या रस्त्यासाठी           प्रचंड मोठी यंत्रणा कार्यरत झाली आहे. या रस्त्याचे कामही अतिशय चांगल्या पध्दतीचे होईल. ज्या-त्या टप्प्यावर या रस्त्याचे काम सुरु असून खुदाई व विस्तारीकरण हे सुरुच राहणार आहे. अनेक वर्षापासूनचे या रस्त्याचे साक्षीदार असलेले वृक्ष तोडण्यात येत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजू भकास दिसत आहेत.