|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » साकेच्या दुषित पाण्याची आरोग्य विभागाकडून पाहणी

साकेच्या दुषित पाण्याची आरोग्य विभागाकडून पाहणी 

‘दै. तरुण भारत’ इफेक्ट – सार्वजनिक विहिरीची स्वच्छता

वार्ताहर / व्हनाळी

साके ता.कागल येथे गावाला पिण्याचा पाणीपुरवठा करणेसाठी असलेल्या सार्वजनिक विहीर व जुन्या टाकीची गेली अनेक वर्षे  ग्रामपंचायतीने स्वच्छता केली नाही. शिवाय याच पाण्यात पक्षी विष्टा करतात व अनेक पक्षांची पंखे पाण्यात कुजल्याम़ुळे हे दुषित पाण्याचा नागरिकांच्या आरोद्यावर विपरित परिणाम होत आहे. अशा पाण्याचा गावाला पाणी पुरवठा होत असलेबाबात ‘दै. तरूण भारत’ ने सोमवार दि. 25 मार्च रोजी फोटोसहीत वृत्त प्रसिध्द केले होते. या बातमीची तातडीने आरोग्य विभागाने दखल घेवून सिध्दनेर्ली आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी डॉ. एस. बी. जुवेकर यांच्या मार्गदर्शनाखील सोमवारी साके गावच्या दुषित पाण्याची पहाणी केली. त्यानंतर जुन्या टाकीतून गावाला दुषित होणारा पाणीपुरवठा बंद करण्याच्या लेखी सुचना ग्रामपंचायीतला दिल्या. शिवाय सार्वजनिक विहिरी भोवती असलेल्या झाडझुडपांची स्वच्छता ताबडतोब करून वेळोवेळी पाण्यात टिसिएल वापरण्याच्या सुचना दिल्या. त्यामुळे ग्रामस्थामध्ये  ‘दै. तरूण भारत’ चे कातुक होत आहे. 

यावेळी सरपंच धनाजी बाचणकर यांनी आरोग्य विभागामार्फत दिलेल्या सुचनेनुसार जून्या जीर्ण टाकीतून होणारा दुषित पाणीपुरवठा ताबडतोब बंद केला असून पर्यायी नवीन व दुसऱया लहान टाकीची वेळोवेळी स्वच्छता करून पाणी पुरवठा केला जाईल. शिवाय नागरिकांच्या आरोग्य चांगले राहण्यासाठी पाण्याच्या विहीरीची स्वच्छता करून पाण्यात टिसीएल वापरून गावाला पाणीपुरवठा करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी आरोग्य साहाय्यक एस. एस. कुंभार, अनिल जोशी, आरोग्य सेवक कुमार पाटील, सुनिल पाटील, तानाजी के. पाटील, दिपक पाटील, अजित गिरी आदी उपस्थित होते.