|Monday, June 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भाजपाचा आज सांगलीत मेळावाःआ.गाडगीळ

भाजपाचा आज सांगलीत मेळावाःआ.गाडगीळ 

प्रतिनिधी/ सांगली

 भाजपाचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ भाजपाच्या वतीने बुधवार दि. 27 मार्च रोजी सांगली-मिरज रोड, राम मंदिर येथील कच्छी जैन भवन येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आ.सुधीर गाडगीळ यांनी दिली.

 सकाळी दहा वाजता मेळाव्याची सुरवात होणार आहे. या मेळाव्यामध्ये कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्यमंत्री व लोकसभा प्रमुख शेखर चरेगावकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख,  आ. सुरेश खाडे, आ. विलासराव जगताप, आ. शिवाजीराव नाईक, आ. अनिल बाबर, लोकसभा संयोजक शेखर इनामदार, माजी आ. दिनकर पाटील, माजी आ. नितीन शिंदे, मुन्ना कुरणे, तसेच शिवसेना, आर.पी. आयचे, रयत क्रांती संघटना, रासपा, शेतकरी संघटना, लोकजनशक्ती संघटना, या मित्रपक्षांचे प्रमुख नेते व पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत.