|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीत ज्योतिष संमेलनाचे आयोजन

सांगलीत ज्योतिष संमेलनाचे आयोजन 

प्रतिनिधी/ सांगली

बृहत महाराष्ट्र ज्योतिष मंडळ पुणे यांच्यावतीने ज्योतीष शास्त्राच्या प्रसारासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या ज्योतीष प्रसार दिडींचे स्वागत आणि विभागीय ज्योतीष साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सांगलीतील जिल्हा नगर वाचनालयाच्या मैदानावर 28 ते 30 मार्च दरम्यान हे संमेलन होणार असून, यासाठी राज्यभरातील 250 हून अधिक ज्योतिषी उपस्थित राहणार आहेत.

 गुरूवार 28 रोजी सायंकाळी सहा वाजता आ. सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार यांचे आगामी लोकसभा निवडणुकीचे ज्योतिषशास्त्र दृष्टय़ा भाकित या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर शुक्रवार 29 मार्च रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत ज्ञानगंगा सत्र होणार आहे. या सत्रात ऍड. मालती शर्मा पुणे यांचे योग विवाह, पत्रीका मेलन, वैवाहिक जीवन, सांगलीचे बन्ने अण्णा यांचे संतती योग, पुण्याचे प्रविणचंद्र मुळये यांचे शिक्षण योग सौ.सुप्रिया सराटे मुंबई यांचे अरिष्टयोग, डॉ.विकास खिलारे सातारा यांचे राहूचे भ्रमण, सौ.रष्मी बिडकर यांचे आरोग्य, प्रदिप सराटे यांचे सामुदायिक शास्त्रावरून धनयोग, ब्रम्हविलासी पाटील सांगली यांचे ज्योतिषशास्त्र व अध्यात्म, दत्तात्रय फडके बेळगावी यांचे मंगळाचे महत्व या विषयावर व्याख्यान होणार आहे.

 तर शनिवार 30 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता प्रसन्न मुळे रत्नागिरी, यांचे परदेशगमन, अमरनाथ स्वामी कोल्हापूर यांचे नोकरी व व्यवसाय, शरद चौगुले सांगली यांचे परदेशातील शिक्षण, विजय मर्देकर मुंबई यांचे वास्तुशास्त्र, प्रिया मालवणकर मुंबई यांचे उपासना, मेघशाम पाठक पुणे यांचे अंकशास्त्र, व्यंकटेश कदम ठाणे यांचे प्रश्न कुंडली आणि राहुल सुतार सांगली यांचे रूलींग प्लॅनेट या विषयावर व्याख्याने होतील.

 सायंकाळी पाच वाजता समारोप व नामवंत ज्योतिषांचे सत्कार करण्यात येणार आहेत. बृहनमहाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे कार्यवाह आनंदकुमार कुलकर्णी आणि नंदकिशोर जकातदार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. सर्वांसाठी हे अधिवेशन विनामुल्य असून, सांगलीकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन ऍड.मालती शर्मा, डॉ.किशोर वझे आणि चेतन कुलकर्णी यांनी केले आहे.

राष्ट्रीय सुरक्षितेत ‘कॉर्पोरेट क्षेत्रा’ चा पुढाकार !!!

 विशेष प्रतिनिधी

शिराळा

   पुलवामा येथील भ्याड हल्ल्यानंतर जेथे सूरक्षा हा अतिसंवेदनशील विषय झाला असताना शासनाच्या माध्यमातून कठोर पाऊले उचलली जात आहेत. या भूमिकेला अधिक बळ देण्याकरीता पुन्हा एकदा “ग्लोबल असोसिएशन फॉर कॉर्पोरेट’’ पुढे आले आहे.

    मुंबई येथे या असोसिएशनच्या माध्यमातून “ महाराष्ट्र अध्याय’’ ची सुरुवात करण्यात आली याच धर्तीवर “राष्ट्रीय सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन’’ यावर एक भव्य विचार मंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारतीय नौदलाचे माजी व्हॉईस ऍडमिरल गिरीश लूथरा तसेच भारतीय हवाई दलाचे माजी एयर कमांडर राहुल मासलेकर आदी दिग्गजांनी उपस्थित राहून आपले विचार मांडले. कॉर्पोरेट क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांनी देशाच्या सुरक्षितेत अधिक व्यापक पद्धतीने कसे योगदान करता येईल याबद्दल सविस्तर आपली मते मांडली.

  या कार्यक्रमात सहभागी झालेले महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक ध. शिवानंधन म्हणाले की “देशाच्या सुरक्षा संदर्भात कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांनी पुढाकार घेतल्यास देशाचे एकंदरीत चित्र बदलेले असेल’’ या  सरकारच्या कार्यकाळात कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांची मानसिकता बदलेली आहे आणि ते देशाचा विकास व सूरक्षेच्या बाबतीत विचार करू लागलेत. नौदलाचे माजी व्हॉईस ऍडमिरल गिरीश लूथरा यांनी सांगितले की “हे असोसिएशन अशी एक संस्था आहे जी देशाच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेत प्रयत्न करीत आहे. आणि जर या संस्थेचा विस्तार देशाच्या काणाकोपऱयात योग्य पद्धतीने झाल्यास देश अधिक गतीने प्रगती पथावर पोहचेल. मुंबई सारख्या महानगरीत आग लागण्याच्या वाढत्या घटनेबद्दल बोलताना मुंबई आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य अधिकारी महेश नार्वेकर म्हणाले की “आग लागण्याच्या घटना नियंत्रणात आणण्यासाठी मागील दोन वर्षात बरीच प्रगती झाली आहे. तसेच संपूर्ण कॉर्पोरेट क्षेत्रास विशेष आदेश देऊन त्यांची अग्निशमन व्यवस्था वेळोवेळी तपासणे आणि सुधारित करण्यास सांगण्यात आले आहे’’. 

या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्य अग्निशमन अधिकारी आणि अग्निशमन सल्लागार  संतोष वारिक यांच्या समवेत आबासाहेब काळे, अमन मल्होत्रा, पूर्वेश, समीर सक्सेना, राहुल लाल, कैप्टन  राजेश,  विभू नारायण,  संजोय रे ,  संतोष उपाध्याय यांसारख्या कॉर्पोरेट क्षेत्रातील दिग्गजांनी आपली मते लोकांसमोर मांडली. यावेळी पंडित मिलिंद रायकर आणि त्यांच्या सहकार्यांनी आपल्या मधुर संगीतातून पुलवामातील शहिदांना श्रद्धांजली अर्पित केली.