|Friday, August 23, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेसला मलाई हवी आम्हाला देशाची भलाई हवी : नरेंद्र मोदी

काँग्रेसला मलाई हवी आम्हाला देशाची भलाई हवी : नरेंद्र मोदी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काँग्रेसला देशाच्या भल्याशी देणे घेणे नसून भ्रष्टाचार करून फक्त पैशांची मलाई कशी चाखता येईल याकडेच त्यांचे लक्ष आहे. त्यांना मलाई हवी आहे, तर आम्हाला देशाची भलाई हवी आहे’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशातील आलो येथे मोदींनी पहिली प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर घणाघात केला.

    आपल्या भाषणात मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली. ’काँग्रेसच्या नेत्यांनी सत्तेत असताना कायम स्वतःला पैसा कसा मिळेल यावरच लक्ष केंद्रित केलं आहे. कोणती योजना असेल तर पैसा कसा खाता येईल, संरक्षणविषयक करार असेल तर दलाली करून पैसे खाणे एवढेच त्यांना माहित होते.जेव्हा जेव्हा देशासाठी चांगली कामे झाली तेव्हा त्यांचे चेहरे पडले आहेत’, असे म्हणत मोदी सरकारवर सतत भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱया काँग्रेसवर पंतप्रधानांनी पटलवार केला.