|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Automobiles » बजाजची सर्वात पॉवरफुल बाईक लाँच

बजाजची सर्वात पॉवरफुल बाईक लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

बजाज कंपनीची नवीन बाईक बजाज डोमीनार 400 लवकरच लॉन्च होणार आहे. या बाईकची बुकिंग जानेवारी महिन्यापासून सुरु करण्यात येणार आहे. बाईकमध्ये एबीएस फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. बजाज डोमीनार 400 ही पावरफुल बाईक म्हणून ओळखली जाणार. अशी कंपनीकडून शक्मयता व्यक्त केली जात आहे.

एक्सशोरुम मध्ये डोमीनार 400 बाईकची किंमत 1 लाख 74 हजार रुपये आहे. आधीच्या बजाज डोमीनार बाईक पेक्षा बजाज डोमिनार 400ची किंमत 12 रुपये अधिक आहे. बजाज डोमीनार बाईकला 2016 मध्ये भारतीय बाजारात दाखल करण्यात आले होते.

 

या बाईकमध्ये 373 सीसी लिक्वडि-कूल्ड फ्युअल- इन्जेक्टेड इंजीन देण्यात आले आहे. सिंगल- सिलेंडर इंजीन 35 बीपीएच पॉवर आणि 35 न्युटन मीटरचा टार्क जनरेट करणार आहे. डोमिनार 400 बाईकमध्ये 6 स्पीड गिअरबॉक्सचा समावेश करण्यात आला आहे. बजाज डोमिनार बाईकची स्पीड 148 किलोमीटर प्रतीतास आहे.