|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » मोदींच्या विरोधात प्रचार करण्यासाठी राज ठाकरे 8 ते 9 सभा घेण्याची शक्यता

मोदींच्या विरोधात प्रचार करण्यासाठी राज ठाकरे 8 ते 9 सभा घेण्याची शक्यता 

आघाडीचा प्रचार आणि मतदान कसे करायचे याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम  

ऑनलाईन टीम / मुंबई :

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रातील मोदी सरकारचा पराभव होण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मते देण्यास सांगितले आहे. इतके नव्हे तर आघाडीचे उमेदवार निवडून येतील यासाठी काम करण्याचे आदेश राज यांनी दिले आहेत. मोदींच्या विरोधात राज ठाकरे यांची तोफ धडधडणार आहे. मोदींच्या विरोधात प्रचार करण्यासाठी राज ठाकरे 8 ते 9 सभा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु मनसेचे सर्व सामान्य कार्यकर्ते आणि मतदार राज ठाकरे यांच्या या निर्णयावर नाराज आहेत, असे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.

भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर राज ठाकरे सातत्याने टीका करत आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला होता. भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी राज यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यास सांगितले आहे. अशा प्रचारचा आदेशच राज यांनी समर्थक, कार्यकर्ता आणि पदाधिकाऱयांना दिला आहे. पण राज यांचा निर्णय पक्षातील अनेक कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱयांना आवडला नाही.

मुंबईतील भांडुप, कांजुरमार्ग, विक्रोळी, शिवडी आणि वडाळासह मनसेचे कट्टर कार्यकर्ते राज यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे नाराज आहेत. नाराज झालेल्या कार्यकर्त्यांच्या मते, ते मुळचे शिवसैनिक आहेत. आम्ही जेव्हा शिवसेनेत होतो तेव्हा धनुष्यबाण किंवा कमळासमोरील बटण दाबत होतो. त्यानंतर जेव्हा मनसेत आलो तेव्हा इंजिनला मत दिले. पण आतापर्यंत कधीच काँग्रेस वा राष्ट्रवादीला मत दिले नाही.राज यांच्या आदेशामुळे मनसेच्या कट्टर कार्यकर्त्यांना असा प्रश्न पडला आहे की, ज्यांना कधी मतदान केले नाही त्यांच्यासाठी काम कसे काय करायचे.