|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Automobiles » 3 दशलक्ष ट्रक्टर्सचे उत्पादन करणारा महिंद्रा पहिला भारतीय ब्रँड

3 दशलक्ष ट्रक्टर्सचे उत्पादन करणारा महिंद्रा पहिला भारतीय ब्रँड 

 

 

 

 ऑनलाईन टीम / पुणे :  20.7 अब्ज डॉलर्सच्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा लि. कंपनीने आज 3 दशलक्ष ट्रक्टर्सची निर्मिती करणारा महिंद्रा हा पहिला भारतीय ब्रँड ठरल्याचे जाहीर केले. जगातील सर्वात मोठी शेती ट्रक्टर उत्पादक आणि गेल्या तीन दशकांपासून भारतातील आघाडीचे उत्पादक असलेल्या महिंद्राने मार्च 2019 मध्ये हा विक्रमी टप्पा पार केला आहे. याचबरोबर कंपनी 2018-19 मध्ये 2 लाख ट्रक्टची निर्मिती केल्यामुळे एकाच आर्थिक वर्षात इतक्मया मोठय़ा संख्येने ट्रक्टर उत्पादन करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली असून यामुळे भारतीय बाजारपेठेतील महिंद्राचे अग्रणी स्थान आणखी बळकट झाले आहे.

1963 मध्ये हार्वेस्टर इंक आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्यातील संयुक्त भागिदारीद्वारे पहिल्या ट्रक्टरची निर्मिती केल्यानंतर 2004 मध्ये कंपनीने एक दशलक्ष उत्पादनाचा टप्पा गाठला. 2009 मध्ये कंपनी जगातील सर्वाधिक शेती ट्रक्टरची विक्री करणारी कंपनी ठरली. त्यानंतर महिंद्रा विभागाने नऊ वर्षानंतर 2013 मध्ये 2 दशलक्ष युनिटचा टप्पा पार केला व त्यानंतर केवळ सहा वर्षात निर्यातीसह पुढील दशलक्षाचा टप्पा गाठत लाखो शेतकऱयांनी ब्रँडवर असलेला विश्वास दाखविला आहे.

तीन दशलक्ष उत्पादनाचा टप्पा सलाजरा करण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा लवकरच भारतातील ग्राहकांसाठी आपका आभार 30 लाख बार हे नवे, सर्वव्यापी अभियान लाँच करणार आहे. या अभियानाद्वारे महिंद्रा सध्याच्या व नव्या ग्राहकांसाठी खास योजना, सेवा लाभ आणि वित्त योजना जाहीर करणार आहे. या विक्रमी टप्प्याविषयी राजेश जेजुरीकर, अध्यक्ष-शेती उपकरण विभाग, महिंद्रा अँड महिंद्रा लि. म्हणाले, भारतातील ट्रक्टर क्षेत्र आणि महिंद्रा ब्रँड हे समीकरण गेल्या सात दशकांपासून प्रस्थापित आहे. तीन दशलक्ष ट्रक्टर्सची विक्री ही त्याचीच पावती आहे. इतकी वर्ष आमच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आम्ही ग्राहकांचे आभारी आहोत.