|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Automobiles » मारुती ‘ओमनी’चे उत्पादन बंद ?

मारुती ‘ओमनी’चे उत्पादन बंद ? 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या मारुती सुझुकी कंपनीने आपल्या ओमनी गाडीचे उत्पादन बंद केल्याचे वृत्त समोर आले आहे. 35 वर्षांपूर्वी मारुतीने ओमनीचे उत्पादन सुरु केले होते. मात्र, आजही या ओमनी गाडीची विक्री मोठय़ा प्रमाणावर होत होती. मात्र, नव्या रस्ते सुरक्षाविषयक नियमांमुळे उत्पादन बंद करण्याचा निर्णय कंपनीनं घेतल्याचं सांगण्यात येत आहे. सरकारने एबीएस, एअरबॅग्ज आणि बीएसव्हीआय बंधनकारक केल्यानंतर अनेक ऑटोमोबाइल कंपन्यांनी आपल्या जुन्या कारचे उत्पादन बंद केले आहे.