|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » भारतीय स्मार्टफोन विक्रीत चीनी कंपन्यांचा दबदबा

भारतीय स्मार्टफोन विक्रीत चीनी कंपन्यांचा दबदबा 

भरतीय बनावटीच्या फोन विक्रीत घट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतात स्मार्टफोन विक्रीत देशी कंपन्याच्या तुलनेत चीनच्या कंपन्याचा दबदबा वाढला आहे. देशातील टॉप 3 कंपन्यांच्या आर्थिक उत्पन्नात मोठी घट झाली असून, 2018 मध्ये या कंपन्यांचे आर्थिक उत्पन्न एक चतुर्थांशनी घटले आहे.

मायक्रोमॅक्स, इंटेक्स आणि लावा या कंपन्यांच्या एकूण उत्पन्नात 22 टक्के घट झाल्याची माहिती समोर आली आहे. तर चीनच्या कंपन्या शाओमी, ओप्पो आणि विवोच्या आर्थिक उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. भारतीय मोबाईल कंपन्यांना एकूण 187 कोटींचा नफा झाला असला तरी तो गेल्यावषीच्या तुलनेत 70 टक्क्यांनी कमी आहे. तर दुसरीकडे चीनच्या शाओमी कंपनीला 293 कोटींचा नफा मिळाला आहे. ओप्पोला 358 कोटी तर विवोला 120 कोटींचे नुकसान झाले आहे.

फीचर फोन विक्रीत रिलायन्स जिओने आपली पकड मजबूत केली आहे. तर स्मार्टफोन विक्रीत चिनी कंपन्यांचा दबदबा वाढला आहे. 2019 मध्येही भारतीय कंपन्यांना नुकसान सोसावे लागण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. मायक्रोमॅक्सचे उत्पन्न 22 टक्क्यांनी कमी झाले. लावा इंटरनॅशनल कंपनीचे उत्पन्न 10 टक्क्यांनी कमी झाले आहे. इंटेक्सचे उत्पन्नही 32 टक्क्यांनी कमी झाले आहे.