|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » टॉटनहॅमची मँचेस्टर सिटीवर मात

टॉटनहॅमची मँचेस्टर सिटीवर मात 

वृत्तसंस्था/ लंडन

टॉटनहॅम हॉस्परने चॅम्पियन्स लीगमधील उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात मँचेस्टर सिटीवर 1-0 असा विजय मिळविण्याचा पराक्रम केला असला तरी हॅरी केनला दुखापत झाल्याने त्यांच्या आनंदावर काहीसे विरजण पडले आहे.

केनने या मोसमात 24 गोल नोंदवले असून या सामन्यातील साठाव्या मिनिटाच्या सुमारास सिटीचा डिफेंडर फॅबियन डेल्फशी जोरदार टॅकल करताना त्याच्या पायाचा घोटा मुरगळल्यानंतर तो वेदनेने कळवळल्याचे दिसून आले. इंग्लंडच्या या स्ट्रायकरने ताबडतोब मैदान सोडले. पुढील आठवडय़ात मँचेस्टरमध्ये होणाऱया दुसऱया टप्प्यातील लढतीसाठी तो उपलब्ध होईल का, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या सामन्यात सॉन हय़ुंग मिनने एकमेव विजयी गोल 78 व्या मिनिटाला नोंदवला. त्याचा हा टॉटनहॅमसाठी या मोसमातील 18 वा गोल होता.