|Thursday, May 23, 2019
You are here: Home » क्रिडा » लिव्हरपूलचा पोर्टोवर विजय

लिव्हरपूलचा पोर्टोवर विजय 

वृत्तसंस्था/ लिव्हरपूल

येथील ऍनफील्ड स्टेडियमवर झालेल्या चॅम्पियन्स लीग उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात लिव्हरपूलने पोर्टोचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. उपांत्य फेरीत बार्सिलोना किंवा मँचेस्टर युनायटेड यापैकी एकाशी त्यांची गाठ पडू शकते.

नॅबी कीटा (पाचवे मिनिट) व रॉबर्टो फर्मिनो यांनी 26 मिनिटांत लिव्हरपूलला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र नंतर त्यांना ही आघाडी वाढविता आली नाही. पुढील आठवडय़ात पोर्टोच्या भूमीत दुसऱया टप्प्यातील लढत 17 एप्रिल रोजी होणार आहे. चॅम्पियन्स लीगमधील लिव्हरपूलचा हा पाच घरच्या सामन्यातील चौथा विजय होता. त्यामुळे 17 रोजी होणाऱया दुसऱया टप्प्यातील सामन्यात एक गोल नोंदवल्यास पुरेसे ठरणार आहे. तर पोर्टोला आगेकूच करण्यासाठी चार करण्याचे आव्हान असेल.

Related posts: