|Monday, August 26, 2019
You are here: Home » क्रिडा » दीपक चहरचा नवा आयपीएल विक्रम

दीपक चहरचा नवा आयपीएल विक्रम 

चार षटकांत सर्वाधिक 20 निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी

वृत्तसंस्था/ चेन्नई

चेन्नई सुपरकिंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा नवा आयपीएल विक्रम नोंदवला आहे. मंगळवारी झालेल्या केकेआरविरुद्धच्या सामन्यात त्याने हा विक्रम नोंदवताना 20 धावांत 3 बळी मिळविले.

या सामन्यात चार षटकांमध्ये त्याने तब्बल 20 निर्धाव चेंडू टाकले. त्याने भेदक मारा करीत ख्रिस लीन (0), रॉबिन उथप्पा (6) व नितिश राणा (0) यांना बाद करून केकेआरची आघाडी फळी कापून काढली. याशिवाय या 26 वर्षीय गोलंदाजाने शेवटच्या हाणामारीच्या षटकांत पूर्ण बहरात असलेला स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल समोर असूनही 19 व्या षटकात तब्बल 5 निर्धाव चेंडू टाकण्याचा पराक्रम केला. त्याच्या या कामगिरीमुळेच चेन्नईने केकेआरला 9 बाद 108 धावांवर रोखण्यात यश मिळविले. चेन्नईने हे माफक आव्हान 18 व्या षटकात केवळ 3 गडय़ांच्या मोबदल्यात पार करून सहज विजय मिळविला. चेन्नईचा पुढील सामना गुरुवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध जयपूरमध्ये होणार आहे.