|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » सॅमसंगचा गॅलेक्सी ए 80 नवीन स्मार्टफोन लवकरच बाजारात

सॅमसंगचा गॅलेक्सी ए 80 नवीन स्मार्टफोन लवकरच बाजारात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सॅमसंगने थायलंडमध्ये आपल्या ए सीरिजअंतर्गत सॅमसंग गॅलेक्सी ए 80 हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि फुल एचडी प्लस सुपर ऍमोलेड डिस्प्ले आहे. या फोनमध्ये डॉल्बी ऍटम ऑडिओही देण्यात आला आहे.

या मोबाईलची किंमत 649 युरो म्हणजेच 50 हजार 500 रुपये इतकी आहे. हा फोन तीन रंगात अँजल गोल्ड, फँटम ब्लॅक आणि घोस्ट व्हाइट रंगात  उपलब्ध होतील. या फोनची विक्री थायलंडमध्ये 29 एप्रिलपासून होणार आहे. भारतात हा फोन कधी लाँच करण्यात येणार आहे. याबाबत कंपनीने अद्याप काहीही सांगितलेले नाही.

Galaxy 80 ची वैशिष्टय़े

6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले

1080 * 2400 रिझाँल्यूशन पिक्सल

8 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज

48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा

8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा

सेल्फीसाठी अल्ट्रा 3डी कॅमेरा

4जी व्हीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ

3700 क्षमतेची बॅटरी