|Thursday, August 22, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय कनिष्ठ डेव्हिस संघाचा पराभव

भारतीय कनिष्ठ डेव्हिस संघाचा पराभव 

वृत्तसंस्था/बँकॉक

येथे झालेल्या कनिष्ठांच्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या राऊंड रॉबिन लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 2-1 असा पराभव केला. ड गटातील भारताचा हा शेवटचा सामना होता. या पराभवामुळे चार संघांचा सहभाग असलेल्या ड गटात भारताला तिसऱया स्थानावर समाधान मानावे लागले.

सलामीच्या एकेरी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सेकूलिकने भारताच्या अजय मलिकचा 53 मिनिटांच्या कालावधीत 6-0, 6-2 असा पराभव केला. या सामन्यात अजयला केवळ दोन गेम्स् जिंकता आले. त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कूपर व्हाईटने भारताच्या सुशांत देबासवर 6-3, 6-4 अशी मात करून आपल्या संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. व्हाईटने हा सामना दीड तासांच्या कालावधीत जिंकला. पुरूष दुहेरीच्या सामन्यात भारताच्या देबास आणि गेहलोतने या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या सेकूलिक आणि ट्रीसेरी यांचा पराभव केला. या लढतीतील पहिल्या सेटस्मध्ये ऑस्ट्रेलिया ट्रीसेरीने दुखापतीमुळे माघार घेतल्याने भारताला या सामन्यात विजय घोषित करण्यात आले. भारताचा या स्पर्धेतील आता पुढील सामना फिलिपिन्सशी होणार आहे. ऑस्ट्रेलिया गुणतक्त्यात आघाडीवर असून न्यूझीलंड दुसऱया स्थानावर, भारत तिसऱया तर इंडोनेशिया चौथ्या स्थानावर आहे.