|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » सुजय विखेंना उमेदवारी देऊन काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईकच केला : मुख्यमंत्री

सुजय विखेंना उमेदवारी देऊन काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईकच केला : मुख्यमंत्री 

 

ऑनलाईन टीम / नगर :

नगरच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र खासदार दिलीप गांधी यांच्या कामाचे कौतुक केले. खासदार दिलीप गांधींनी चांगले काम केले. तुम्हाला विसरणार नाही, असे फडणवीस यावेळी म्हणाले. ते म्हणाले, गांधी यांनी चांगले काम केले. मात्र कधी कधी सर्जिकल स्ट्राईक करावा लागतो. सुजय विखेंच्या माध्यमातून काँग्रेसवर तोसर्जिकल स्ट्राईक केला आहे. राष्ट्रवादीचे कॅप्टन ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरले आणि सात दिवसांत 12 वा खेळाडू म्हणून बसले.राहुल गांधी त्यांच्या मित्रांना अनेकदा म्हणतात माझ्या सभेत लोक मोदी मोदी का करतात मी मोदींसारखा दिसतो का असा खोचक टोला देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी राहुल गांधी यांना लगावला.