|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » नवाझउद्दीनचा भाऊ शमशुद्दीन विरोधात शंभर कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा

नवाझउद्दीनचा भाऊ शमशुद्दीन विरोधात शंभर कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

अभिनेता नवाझउद्दीन सिद्दीकीचा भाऊ नवोदित दिग्दर्शक शमशुद्दीन सिद्दीकीने एका प्रकाशन संस्थेच्या विरोधात शंभर कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला आहे. स्त्री कलाकारांसोबत शमशुद्दीनची वागणूक आक्षेपार्ह असल्याचा खटला दाखल करण्यात आला आहे.

‘बोले चुडिया’ या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन शमशुद्दीन सिद्दीकी करत आहे. यामध्ये नवाझुद्दीनसोबत अभिनेत्री मौनी रॉय प्रमुख भूमिकेत आहे. यात माध्यमांमध्ये आपली अवमानकारक प्रतिमा उभी करण्यात आली आहे. असे शमशुद्दीनने याचिकेत म्हटले आहे.

शमशुद्दीनच्या गैरवर्तनामुळे अनेक अभिनेत्रींनी चित्रपट सोडला असा दावा संबंधित मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. त्यामुळे प्रतिमा मलीन केल्याचा आरोप करत शमशुद्दीनने त्यांना कोर्टात गेले आहेत. यावर नवाझने अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.