|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » नववे विश्व मराठी साहित्य संमेलन ‘कंबोडिया अंग्कोरवाट’ येथे

नववे विश्व मराठी साहित्य संमेलन ‘कंबोडिया अंग्कोरवाट’ येथे 

 

पुणे / प्रतिनिधी

विश्व मराठी परिषदेच्या वतीने आयोजित नववे विश्व मराठी साहित्य़ संमेलन ‘कंबोडिया अंग्कोरवाट’ येथे दि. 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. या संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष निलेश गायकवाड, लेखिका डॉ. माधवी वैद्य व राजेंद्र गुंड यांच्या हस्ते शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले.

यंदाचे हे नववे साहित्य संमेलन असुन यापुर्वी अंदमान, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, मॉरिशस, भूतान, बार्ली व दुबई येथे हे संमेलन भरविण्यात आले आहे. यंदा कंबोडिया येथील अंग्कोरवाट या ठिकाणी हे संमेलन भरविण्याचे ठरविण्यात आले आहे. अंग्कोरवाट हे मंदिर जगातील सातवे आश्चर्य मानले जाते. यावर्षी संमेलनासाठी ‘पुरातन स्थापत्य शास्त्र’ या विषयावर आधारीत हे संमेलन आहे. या संमेलनामधील परिसंवादांमध्ये मराठी माध्यमांतील नामवंतांप्रमाणेच कंबोडिया येथील ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, कलावंत व लेखक सहभागी होणार आहेत. जागतिक समुदायाशी मराठी माणसांना जोडणे, जगभरातील मराठी माणसांचे संघटन करणे, मराठी माणसांचे अनुभवविश्व समृध्द करणे आदी या संमेलना मागचा हेतु आहे. या संमेलनात सहभागी होण्याकरीता किंवा अधिक माहितीसाठी 9422769365 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे यावेळी सांगण्यात आले.