|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » बदलापूर-कर्जत मार्गावरील मेगाब्लॉक रद्द

बदलापूर-कर्जत मार्गावरील मेगाब्लॉक रद्द 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मध्य रेल्वेवरील बदलापूर-कर्जत दरम्यान रविवारी (दि.14) घेण्यात येणार मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. इतर स्थानकांदरम्यानचे मेगाब्लॉक ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे घेण्यात येणार आहे. पुलासंबंधीच्या कामासाठी बदलापूर-कर्जत दरम्यान सकाळी 10.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार होता. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे हा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.