|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » राज ठाकरेंच्या सभा म्हणजे स्टँड अप कॉमेडी शो

राज ठाकरेंच्या सभा म्हणजे स्टँड अप कॉमेडी शो 

 

 ऑनलाईन टीम / मुंबई :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा म्हणजे स्टँड अप कॉमेडी शो आहेत. महाराष्ट्रात अजून काही ठिकाणी त्यांचे स्टँड अप कॉमेडी शो पार पडणार आहेत, असा उपरोधित टोला विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांना लगावला.

राज ठाकरे सध्या मोदी आणि अमित शाह यांना संपवण्याची भाषा करत आहे. राज ठाकरेंच्या पक्षाचा एकही खासदार नाही, एकही आमदार नाही, उरलेसुरले नगरसेवकही पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे स्वतःचा पक्ष संपलेला असताना दुसऱयाला संपवण्याची भाषा राज ठाकरे करत आहेत असाही टोला तावडे यांनी लगावला.

राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत स्वतः कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करत नाहीत. त्यांच्या जाहीर सभांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन करत आहेत. त्यामुळे या सभांचा खर्च त्या ठिकाणच्या उमेदवाराच्या खात्यात धरण्यात यावा अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे लवकरच करणार आहोत असेही तावडे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांच्या जाहिर सभांचा खर्च कुठल्या पक्षाच्या खात्यात दाखविला गेला पाहिजे याची माहितीही निवडणूक आयोगाने जनतेला द्यावी अशी मागणीही आम्ही करणार असल्याचेही तावडेंनी म्हटलं आहे.