|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » मोदींविरोधातील वक्तव्यामुळे राहुल गांधींना न्यायालयाची नोटीस

मोदींविरोधातील वक्तव्यामुळे राहुल गांधींना न्यायालयाची नोटीस 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

राफेल व्यवहार प्रकरणावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यात आले आहे. राफेल विमान खरेदी प्रकरणावरुन ‘चौकीदार मोदी चोर हैं’ असे वक्तव्य राहुल यांनी केले होते. त्याच वक्तव्याने सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे.

भाजपा खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमानना याचिकेवरुन सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना ही नोटीस बजावली आहे. या नोटीसला राहुल गांधी यांनी 22 एप्रिलपर्यंत न्यायालयाला उत्तर द्यावे असे न्यायालयाने म्हटले आहे. राहुल गांधींनी या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाशी संबंध लावला असे न्यायालयाने म्हटले आहे.