|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » leadingnews » विश्वचषकासाठी राहुल, कार्तिक, शंकरला संधी

विश्वचषकासाठी राहुल, कार्तिक, शंकरला संधी 

 

ऑनलाईन टीम/ मुंबई : इंग्लंडध्ये होणाऱया आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, दुसरा यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे. तर, रिषभ पंतला मात्र डच्चू देण्यात आला. तसेच भारतीय संघाने चार अष्टपैलू खेळाडू घेतले आहेत.

भारतीय संघाने 1983 आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. 2007 मध्ये भारताने ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही नावावर केला आहे. विशेष म्हणजे 2011 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सात खेळाडू 2019 च्या स्पर्धेतही खेळणार आहेत. बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी आणि निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी हा संघ जाहीर केला.

भारतीय संघ पुढीलप्रमाणेः

शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांडय़ा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा