|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘बिग बॉस’मराठीचा दुसरा सीझन मे मध्ये सुरु होणार?

‘बिग बॉस’मराठीचा दुसरा सीझन मे मध्ये सुरु होणार? 

 

 ऑनलाईन टीम / मुंबई:  ‘बिग बॉस’मराठीच्या दुसऱया सीझन कधी सुरु होणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. हा शो मे महिन्यात सुरु होत असल्याचे कळत आहे.

‘बिग बॉस मराठी’ नेमकं कधी सुरू होणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. परंतु, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा कार्यक्रम मे महिन्यात सुरू होईल. यापूर्वी 14 एप्रिल ते 21 एप्रिल दरम्यान शो सुरू होणार होता. मात्र, लोकसभेच्या निवडणुकांमुळे या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे, आता 5 मे ते 12 मे दरम्यान ‘बिग बॉस मराठी’चा दुसरा सीझन सुरू होऊ शकतो.

बिग बॉसच्या या नव्या सीझनमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री रसिका सुनील, अर्चना निपाणकर, वीणा जगताप, अभिनेता गश्मीर महाजनी हे कलाकार सहभागी होणार असल्याची शक्मयता वर्तवण्यात येत आहे.