|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » उद्योग » बँक ऑफ बडोदा विलीनीकरणास लागणार दोन वर्षाचा कालावधी!

बँक ऑफ बडोदा विलीनीकरणास लागणार दोन वर्षाचा कालावधी! 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देना बँक आणि विजया बँक यांच्या विलीनीकरणामुळे बँक ऑफ बडोदा देशातील तिसऱया क्रमांकाची बँक ठरली आहे. पण या विलीनीकरणास दोन वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱयांकडून सांगण्यात आले आहे.

एक एप्रिलपासून देना बँक, विजया बँक आणि बडोदा बँकेची विलीनीकरण प्रक्रिया सुरू झाली आहे. तथापि, या प्रक्रियेची प्रत्यक्ष कारवाई करण्यास दीर्घकाळ लागणार आहे. तिन्ही बँकांचे आयटीसंबंधी कामकाज एकत्रित करण्यास किमान एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अन्य विलीनीकरण कारवाई पूर्ण करण्यासाठीही एक वर्ष लागणार आहे, असे बँक अधिकाऱयांकडून सांगण्यात आले आहे.

निविदा मागविल्या जाणार

दैनंदिन कामकाज आणि व्यवस्थापनात अधिकाधिक व्यावसायिकता आणण्यासाठी बँकेचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे संचालक मंडळाची कार्यक्षमता नियमित तपासण्यात येणार असून त्यासाठी सल्लागार कंपन्यांकडून निविदा मागविण्यात येणार आहेत.