|Monday, April 22, 2019
You are here: Home » Top News » …तर पुस्तक लिहावे लागेल

…तर पुस्तक लिहावे लागेल 

 

 ऑनलाईन टीम / जळगाव : बारामतीची जागा जर पाडली, तर आपण काय काय केलं यासंदर्भात पुस्तक लिहावं लागेल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. सध्या आपण बारामतीवर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. माध्यमांवर जे सुरू आहे त्यावरून आपल्याला अंदाज येत असेलच. तिथे जोमाने प्रचार सुरू आहे. असं सांगत कार्यकर्त्यांनी तसा प्रचार प्रसार जळगावातही करावा, असं आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं.

पाटील यांनी सोमवारी जिह्यातील भुसावळ, यावल, जळगाव व भडगाव येथे बैठका घेतल्या. त्यात ते बोलत होते. माध्यमांच्या सर्व्हेनुसार आपणच निवडून येऊ. पण त्यामुळे झोपून राहू नका. आपल्याला यंदा 373 जागांचे टार्गेट आहे. मतदानाची टक्केवारी कमी झाली तर भाजपासाठी ती धोक्मयाची घंटा ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला. चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपानं बारामतीची जबाबदारी सोपवली आहे.

 

Related posts: