|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » उद्योग » बाजारात 11 हजार कोटींची विदेशी गुंतवणूक

बाजारात 11 हजार कोटींची विदेशी गुंतवणूक 

मुंबई

 शेअर बाजाराकडे विदेशी गुंतवणुकदारांनी पसंती दर्शविल्यामुळे मोठय़ा गुंतवणुकीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुंतवणुकदारांनी चालू महिन्यात शेअर बाजारात 11,096 कोटी रुपये गुंतवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. येणाऱया निवडणुकीनंतर स्थिर सरकार आल्यावर गुंतवणूक वाढण्याची आशा अर्थतज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

विशेषतः निवडणुकीच्या काळात विदेशी गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी प्रयत्नशील नसतात. मात्र, भारतीय शेअर बाजार यासाठी अपवाद ठरला आहे. मुंबई शेअर बाजाराने गेल्या काही दिवसात दोनदा 39 हजारांचा टप्पा पार केल्याचे स्पष्ट झाले आहे. फेब्रुवारीत 11,182 कोटी तर मार्चमध्ये 45,981 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांचा कल शेअर बाजाराकडे वाढल्याचे निदर्शनास आले आहे.