|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » मोदी काँग्रेसला उध्वस्त करतील

मोदी काँग्रेसला उध्वस्त करतील 


 

 ऑनलाईन टीम / मुंबई:  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधान उध्वस्त करतील, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला तो पूर्णपणे चुकीचा आहे. मोदी हे संविधानाचे रक्षक आहेत. संविधनाला नाही तर या देशातून काँग्रेसला उध्वस्त करतील. संविधनाला कोणी उध्वस्त करू शकत नाही जे संविधन उध्वस्त करण्याचा विचार करतील तेच या देशातून उध्वस्त होतील असा इशारा रिपब्लकिन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिला

आसाम येथील सिलचर मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करताना रामदास आठवले बोलत होते. पंतप्रधन नरेंद्र मोदींवर ते संविधन उध्वस्त करतील अशी टीका विरोधी पक्षांकडून वारंवार केली जाते. या टीकेवर आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी भाष्य करत नरेंद्र मोदी हे संविधन उध्वस्त करणार नाहीत मात्र काँग्रेस पक्षाला नक्की उध्वस्त करतील असा टोला विरोधकांना लगावला.