|Monday, April 22, 2019
You are here: Home » Top News » मोदी अंबानींचेच चौकीदार

मोदी अंबानींचेच चौकीदार 

 

नांदेड / प्रतिनिधी:  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगपती अनिल अंबानी यांचे चौकीदार आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधले.

नांदेड येथील प्रचारसभेत ते बोलत होते. गांधी म्हणाले, मोदी हे श्रीमंतांचे चौकीदार आहेत. त्यांनी अनेक वायदे केले. पण, ते पूर्ण केले नाहीत. शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शब्द दिला. मात्र, पाळला नाही. 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले गेले. प्रत्यक्षात कुणाच्याच खात्यात पैसे जमा झाले नाहीत. या सरकारच्या काळात सामान्यांचे काही भले झाले नाही. उलट शेतकरी, छोटे दुकानदार नाडले गेले. केवळ बडय़ा उद्योगपतींवरच या सरकारने मेहेरनजर केली. 30 हजार कोटींचे रॅफेलचे डील अंबांनांबरोबर करण्यात आले. फ्रान्स मीडियानेही काय ते स्पष्ट केले आहे. त्यामुळे मोदी यांनी कुणासाठी चौकीदारी केली, हे स्पष्ट होते.

 

 

Related posts: