|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » क्रिडा » पंजाब-राजस्थान लढत आज

पंजाब-राजस्थान लढत आज 

मोहाली / वृत्तसंस्था

यंदा आयपीएल मोसमात सातत्य दाखवू न शकलेला पंजाब किंग्स इलेव्हनचा संघ आज (दि. 16) घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्ध गोलंदाजीतील कच्चे दुवे हेरत आपल्या कामगिरीत सुधारणा घडवण्यासाठी प्रयत्न करेल. अश्विनच्या नेतृत्वाखालील पंजाबचा संघ मुंबई इंडियन्स व आरसीबीविरुद्ध लागोपाठ पराभव स्वीकारावे लागल्यानंतर सध्या पाचव्या स्थानी फेकला गेला आहे. पंजाबला आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यात 4 विजय नोंदवता आले आहेत.

पंजाबची गोलंदाजी काही टप्प्यापुरतीच उत्तम झाली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध ते 197 धावांचेही संरक्षण करु शकले नव्हते. केरॉन पोलार्डने त्यावेळी 31 चेंडूत 83 धावांची आतषबाजी करत जणू तो सामनाच त्यांच्या हातून हिसकावून घेतला होता. आरसीबीविरुद्ध मागील लढतीत देखील ते गोलंदाजीतच अपयशी ठरले. प्रतिस्पर्धी संघाने तेथे 173 धावांचे आव्हान चार चेंडूंचा खेळ बाकी राखून पार केले. मोहम्मद शमी, ऍन्ड्रय़्रू टाय व अष्टपैलू सॅम करण बरेच महागडे ठरले. कर्णधार अश्विनने त्या तुलनेत कल्पक गोलंदाजी साकारली.

दुसरीकडे, राजस्थानचा संघ मागील लढतीतील विजयासह येथे पोहोचला आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई इंडियन्सला चार गडी राखून धूळ चारली. सध्या ते 7 सामन्यात केवळ दोन विजयांसह सातव्या स्थानी फेकले गेले आहेत. जोस बटलरच्या 43 चेंडूतील 89 धावांच्या खेळीमुळेच त्यांना मुंबईविरुद्ध 188 धावांचे आव्हान पार करता आले होते. अजिंक्य रहाणेने 37 तर संजू सॅमसनने 31 धावांचे योगदान दिले होते. याशिवाय, राजस्थानला अन्य विजय केवळ आरसीबीविरुद्धच मिळवता आला आहे.

संभाव्य संघ

राजस्थान रॉयल्स : स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, ऍस्टॉन टर्नर, ईश सोधी, ओशेन थॉमस, लियाम लिव्हिंगस्टोन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शुभम रंजने, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, सुधेशन मिधुन, जयदेव उनादकट, प्रशांत चोप्रा, महिपाल लोमरोर, आर्यमन बिर्ला, रियान पराग, धवल कुलकर्णी, कृष्णप्पा गौतम, वरुण ऍरॉन, शशांक सिंग, मनन वोहरा, राहुल त्रिपाठी.

किंग्स इलेव्हन पंजाब : लोकेश राहुल (कर्णधार), ख्रिस गेल, मायंक अगरवाल, सर्फराज खान, डेव्हिड मिलर, मनदीप सिंग, सॅम करण, रविचंद्रन अश्विन (कर्णधार), ऍन्ड्रय़्रू टाय, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, मुजीब-उर-रहमान, करुण नायर, मोईसेस हेन्रिक्यूज, वरुण चक्रवर्ती, हरप्रीत ब्रार, सिमरन सिंग, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), व्हिल्जोएन, अंकित रजपूत, अर्शदीप सिंग, दर्शन नळकांडे, अग्निवेश अयाची.

सामन्याची वेळ : रात्री 8 वा.