|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मोक्मयातील फरारी आरोपी जेरबंद

मोक्मयातील फरारी आरोपी जेरबंद 

कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांची कारवाई

वार्ताहर/ हुपरी

मोक्का कारवाई मधील फरारी आरोपी सनी गौतम मोहिते (वय 31 रा. उचगाव ता. करवीर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या पथकाने पकडून हुपरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. तो कुख्यात गुंड विशाल बाळासो रुपनूर (रा. खंडेराजुरी ता. मिरज) यांच्या गुन्हेगारी टोळीतील आहे.

हुपरी येथील चांदी सोन्याचे सराफ उद्योजक दतात्रय भरमा पुजारी यांचे कारदगा (ता. चिकोडी) येथे दुकान आहे. त्याचा मुलगा श्रीरंग पुजारी (दोघेही रा. होळकर नगर हुपरी) हे दोघे 25 जानेवारी रोजी कारदगाहून रेंदाळ मार्गे हुपरीला मोटारसायकलवरून येत असताना रस्त्यात निर्जन ठिकाणी पत्ता विचारण्याचा बहाणा करून गुंड विशाल रुपनूर याच्या टोळीने अडविले. त्याच्याजवळ असलेली सोन्या चांदीच्या दागिन्यासह रक्कम असलेली बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलग्याने जोरदारपणे विरोध केल्याने त्या टोळीने त्या दोघांच्यावर गोळीबार केला त्यात दतात्रय पुजारी जखमी झाले होते. या प्रकरणी हुपरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यासंदर्भात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसानी फरार असलेल्या आरोपीचा शोध घेत होते. शोध सुरू असताना उचगावमध्ये सनी गौतम मोहिते राहण्यास आहे याची माहिती मिळाली. त्यानुसार तेथे त्याला गुप्त पद्धतीने जाऊन ताब्यात घेतले व हुपरी पोलिसांच्या स्वाधीन करून अटक केली.या तपास कामी शाहुवाडीचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील करीत आहेत.