|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अथायु सिटी क्लिनिक’ गरजूंना सेवा देईल

अथायु सिटी क्लिनिक’ गरजूंना सेवा देईल 

कर्नल विजयसिंह गायकवाड यांचे प्रतिपादन, अथायु सिटी हॉस्पिटले उद्घाटन

प्रतिनिधी/ कोल्हापूर

अथायु सिटी क्लिनिकद्वारे पश्चिम महाराष्ट्रातील गरजूंना दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल, असा विश्वास कर्नल विजयसिंह गायकवाड यांनी व्यक्त केला.

उजळाईवाडी येथील अथायु हॉस्पिटलने ट्रेंड सेंटर येथे अथायु सिटी क्लिनिक सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन रविवारी सकाळी कर्नल गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. श्रीकांत कोले होते. यावेळी अमोल कोरगावकर, पोलीस उपाधिक्षक आर. आर. पाटील, करणसिंह घोरपडे, दीपा पाटील, अनंत सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

कर्नल गायकवाड म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञान अन् आंतरराष्ट्रीय दर्जाची आरोग्य सेवा अथायु हॉस्पिटलद्वारे जनतेपर्यत पोहोचवली जात आहे. रूग्णसेंवेचा वसा घेत आंतरराष्ट्रीय दर्जाची आरोग्य सेवा हॉस्पिटलद्वारे दिली जात आहे. कोल्हापूर, सांगली, कोकण आणि हातकणंगले भागातील गरजुंना सहजरित्या आरोग्य सेवा देण्यासाठी अथायु सिटी क्लिनिक सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. श्रीकांत कोले यांनी अथायु मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलद्वारे या क्लिनिकमध्ये मोफत रोगनिदान आणि तपासणी तज्ञांद्वारे केली जाणार आहे. क्लिनिकमध्ये कर्करोग शस्त्रक्रिया, किडनी, मुत्रविकार, अस्थिरोग, सांधेरोपण शस्त्रक्रिया, हृदयरोग, स्त्रीरोग, जनरल सर्जरी, जनरल मेडीसीनचे तज्ञ रूग्ण तपासणी करणार आहेत. हॉस्पिटलमध्ये ज्योतिबा फुले जनआरोग्य, कर्नाटक श्री आरोग्य योजना, गोव्याची दिनदयाळ योजना आणि पोलीस आरोग्य कुटुंब योजनेच लाभ रूग्णांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कोरगावकर, पोलीस उपाधिक्षक आर. आर. पाटील, करणसिंह घोरपडे यांची भाषणे झाली. अनंत सरनाईक यांनी स्वागत करून आभार मानले.