|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राज्यातील अपूर्ण प्रकल्पासाठी 20 हजार कोटीचा निधी : गडकरी

राज्यातील अपूर्ण प्रकल्पासाठी 20 हजार कोटीचा निधी : गडकरी 

प्रतिनिधी / लातूर

स्वातंत्र्यापासून म्हणजे 1947 पासून ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीपर्यंत काँग्रेसची सत्ता होती. मधल्या काळात आम्ही अटलजींच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे सत्तेत होतो. गेली 60 वर्षे काँग्रेसने पाण्याच्या प्रकल्पासाठी प्राधान्य दिले नाही. 70 हजार कोटी रुपयाचे विमान खरेदी केल्याचा निर्णय घेतला. परंतू पाण्याच्या प्रश्नावर एकही पैसे देऊ शकले नाहीत. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना 10 टक्के कमिशन घेऊन कंत्राटदारांना कामे दिली पंरतू कामे पूर्ण होवू शकली नाहीत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्र सरकारने 26 प्रकल्पाला 20 हजार कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने दिले असून, यातील मराठवाडय़ाला 4 हजार 177 रुपये दिले असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी जाहीर सभेत दिली.

  लातूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत नितीन गडकरी बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुनील गायकवाड, रूपाताई पाटील निलंगेकर, डॉ. गोपाळराव पाटील, आ. सुधाकर भालेराव, मिलींद लातूरे, रामचंद्र तिरूके, महापौर सुरेश पवार, ऍड. मिलींद पाटील, अरविंद पाटील यांच्यासह रिपाइंचे चंद्रकांत चिकटे, रासपचे दादासाहेब करपे उपस्थित होते.

  गडकरी म्हणाले, मी मंत्री झाल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने अर्धवट ठेवलेल्या सिंचनाच्या स्मारकाना चाळीस हजार कोटी रूपयांचा निधी दिला. एका अर्थाने ही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आत्म्याला श्रध्दांजलीच असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाने अर्धवट प्रकल्पांसाठी निधी देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे ते म्हणाले.

  लातुरात जलसंवर्धनाचे काम अतिशय चांगले झाले आहे. लातुरात 4.2 लाख क्युबिक मिटर नवा पाणीसाठा होणार आहे. देशपातळीवर लातूरने सर्वाधिक पारितोषिके मिळवली आहेत. लातूरकरांच्या प्रयत्नाने सर्वांनाच दिशा मिळाली आहे. रेल्वेने पाणी आणणे ही नामुष्की आहे. परंतु भविष्यात अशी वेळ येणार नाही. जनता व शेतकऱयांच्या सहकार्यातूनच हे शक्य होणार आहे. वीज, पाणी, दळणवळण व संपर्क साधणे विकासासाठी महत्वाची असतात. लातूर ही गुणवंताची खाण आहे. शिक्षणाचा लातूर पॅटर्न प्रसिद्ध आहे. येथे शेती आणि उद्योगांना पाणी मिळाले तर विकासाला खूप मोठी संधी आहे असेही ते म्हणाले.

  मराठवाडय़ात पाण्याचा प्रश्न कायम आहे. तो सोडविण्यासाठी पाणी जमिनीत मुरवणे गरजेचे आहे. नदीजोड प्रकल्प हा देखील त्यासाठी पर्याय असून राज्यात असे दोन प्रकल्प मी हाती घेतले आहेत. दमणगंगा प्रकल्प सुरू करून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीमध्ये आणण्याची योजना आहे. या माध्यमातून मराठवाडा सुजलाम सुफलाम होईल. दुसरा प्रकल्प तापी व नर्मदा या नद्यांवर राबविला जाणार आहे. देशात व राज्यात पाण्याची कमतरता नाही फक्त नियोजनाची कमी आहे. यासाठी शेततळी घ्या, नदी, नाल्यांचे खोलीकरण करा व पाणीसाठा वाढवा असेही ते म्हणाले.

  हा देश कोणाचीही जहागीर नाही. काँग्रेस आज गरीबी हटावचा नारा देत आहे. परंतु गरीबांना अधिक गरीब करण्याचे पाप काँग्रेस व राष्ट्रवादीने केले आहे. जातीयवाद व सांप्रदायिकता त्यांनीच वाढवली. कोणताही माणूस जातीने नव्हे तर गुणाने मोठा होतो. मानवतेच्या आधारावर सबका साथ… सबका विकास  हे आमचे धोरण आहे. गरीबी हटली पाहिजे. सुखी, संपन्न व समृध्द हिंदुस्तान निर्माण झाला पाहिजे, हाच आमचा विचार आहे. हे करीत असताना देशाची सुरक्षाही तेवढीच महत्वाची आहे. आम्हाला दहशतवाद्यांसमोर घुटणे टेकणारा पंतप्रधान नको तर ईट का जवाब पत्थरसे देनेवाला पंतप्रधान हवा असल्याचे त्यांनी सांगितले.

 सूत्रसंचालन ऍड. शैलेश गोजमगुंडे यांनी केले तर सभेचे प्रास्ताविक शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी तर आभार प्रदर्शन प्रविण सावंत यांनी केले. 

लग्न भलत्याचंच…पोरं आम्ही खेळवतोय

आपल्या खुमासदार शैलीत नितीन गडकरी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा चांगलाच समाचार घेतला. अर्धवट सिंचन प्रकल्पाबाबत बोलताना काँग्रेस व राष्ट्रवादीने प्रकल्प अर्धवट सोडून दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. आता आम्ही तेच प्रकल्प पूर्ण करत आहोत असे सांगताना लग्न भलत्याचंच झाल.. पोरंही झाली.. आणि ती लेकर बाबा.. बाबा.. म्हणत आज आम्हाला चिकटत आहेत. मी व देवेंद्र या लेकरांना मांडीवर घेवून खेळवत आहोत असा उ