|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उदयनराजेंच्या रॅलीस वाईत प्रतिसाद

उदयनराजेंच्या रॅलीस वाईत प्रतिसाद 

प्रतिनिधी/ वाई

काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्र पक्षांचे सातारा लोकसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ वाईत प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, त्यास उदंड प्रतिसाद मिळाला.

रॅलीत खासदार उदयनराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, शशिकांत पिसाळ, प्रताप पवार, विजयसिंह नायकवडी, उपसभापती अनिल जगताप, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, भारत खामकर, चरण गायकवाड, रमेश गायकवाड, भय्यासाहेब डोंगरे, शशिकांत पवार, महादेव मस्कर, चंद्रकांत भोसले, विकास शिंदे, ऍड. विकास पवार, प्रदीप चोरगे, मनीष भंडारे, नीलेश डेरे, यशवंत जमदाडे, सतीश बाबर, आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

शिवाजी चौकांतून रॅलीस सुरुवात झाली. तेथून सिधनाथवाडी, महागणपती पुलावरुन गणपती मंदिर, डॉ. घोटवडेकर हॉस्पिटल, मधली आळी, गंगापुरी, शाहीर चौकातून येऊन पालिका कार्यलय, भाजी मंडई, महावीर चौक, रविवार पेठ, जुन्या कृष्णा पुलावरून सोनगीरवाडी बाजार समितीजवळ रॅलीची सांगता झाली. हातात झेंडे व गळ्यात पक्षाचे चिन्ह असलेले मफलर कार्यकर्त्यांनी परिधान केले होते, तर रिक्षांवर ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हे प्रचारगीत लक्ष वेधून घेत होते. ठिकठिकांणी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी उदयनराजे भेसले यांचे स्वागत केले.