|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विकास कामांसाठी आपच्या उमेदवारांना विजयी करा

विकास कामांसाठी आपच्या उमेदवारांना विजयी करा 

प्रतिनिधी/ पणजी

 गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांनी जसे राज्यात विकासाचे सरकार दिले तसेच सरकार आप गोव्यासाठी देणार आहे. यासाठी लोकांनी भाजप, कॉंगेस, मगो या पक्षांना मतदान न करता आपच्या सर्व उमेदवारांना निवडून आणावे, असे यावेळी आपचे पणजी पोटनिवडणूकीचे उमेदवार वाल्मिकी नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

 आपचे सर्वेसर्वा केजरीवाल यांनी दिल्लीत जी शिक्षण व आरोग्य क्षेत्रात सुधारणा केली आहे तशी कुठल्याच सरकारने अजून केली नाही. आप पक्षाचा जन्म भ्रष्टाचार विरोधी चळवळीपासून झाला आहे. हे सर्वसमान्यांचे सरकार आहे. आप केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यात जसे भाऊसाहेबांनी विकासकामे पेली तसेच काम करणार आहे, असे यावेळी वाल्मिकी म्हणाले.

 भाऊसाहेब बांदोडकरांच्या मगो पक्षाच्या नावाने ढवळीकर बंधूनी गेली अनेक वर्षे सत्ता केली. पण त्यांनी भाऊसाहेबांचे विचार आत्मसात केले नाही त्यांनी बांदोडकरांची सर्व तत्वे गहाण ठेऊन स्वार्थासाठी राजकारण केले. ढवळीकर बंधूने मगो पक्षाला ढवळीकर ट्रस्ट बनविला आहे. भाजप असो वा काँगेस सर्व पक्षाच्या सरकारमध्ये आपली पोळी भाजून घेतली. साबांखा व वाहतूक खाते घेऊन राज्याची लुबाडणूक केली आहे. भाजपने त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकल्याने आता काँग्रेसला पाठीबा देण्याचा विचार मगोचा आहे. लोकांनी मगोच्या या भुलथापांना बळी पडू नये. ढवळीकर बंधू  स्वार्थासाठी राजकारण करत आहे, असे आरोप आपचे प्रदीप घाडी आमोणकर यांनी केले. 

 ढवळीकर बंधूनी मगोच्या नावाने गेली अनेक वर्षे राजकारण करुन राज्याला लुटले आहे. भऊसाहेबांनी जो विकास केला बहुजनासाठी काम केले अशी  विकास कामे या नेत्यांनी केली नाही. फक्त लोकांची फसवणूक केली. आता सत्ता आहे त्या पक्षात या ढवळीकर बंधूनी राज केले व स्वःताचा विकास केला. त्यामुळे आता गोव्यातील जनत ढवळीकर बंधूना कंटाळली असून त्यांचे राजकीय अस्थित्व आता कमी झाले आहे, असे आपचे प्रदिप पाडगांवकर यांनी सांगितले.