|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अंकली परिसराला टँकरच्या पाण्याचा

अंकली परिसराला टँकरच्या पाण्याचा 

वार्ताहर/   मांजरी

कृष्णा नदी कोरडी पडल्याने अंकली परिसराला नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. पाण्याची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्याचे चित्र पाहता कृष्णेच्या पात्रात पाणी नसल्याने कूपनलिका व टँकरचा आधार नागरिकांना घ्यावा लागत आहे.

पाण्याअभावी नागरिकांची होत असलेली भटकंती पाहता ग्रामपंचायतीतर्फे कूपनलिका दुरुस्त करण्यात येत आहेत. ज्या प्रभागात कूपनलिका आहेत अशा प्रभागात कूपनलिकांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर उर्वरित प्रभागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या उष्णतेच्या झळा वाढल्या आहेत. नदीमध्ये पाणी नसल्याने कूपनलिकासारख्या इतर स्त्राsताचा वापर करावा लागत आहे.

नदी कोरडी पडल्याने याचा सर्वाधिक फटका शेतीला बसत आहे. उन्हाळय़ाचे दिवस असल्याने पिकांना पाण्याची आवश्यकता असते. पण पाण्याअभावी पिके करपू लागली आहेत. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची चिंता होती पण ग्रा. पं. ने टँकरद्वारे पाणीपुरवठा करुन सदर समस्या निवारण्याचा प्रयत्न केला आहे. पण शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी मात्र मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक शेतकरी भाडय़ाच्या स्वरुपात कूपनलिका अथवा विहिरीचे पाणी पिकांना वाचविण्यासाठी घेत असल्याचे पहावयास मिळत आहे.

कृष्णा नदी कोरडी पडल्याने पाणी समस्या गंभीर बनत चालली आहे. महाराष्ट्रातून केंव्हा पाणी येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. जमिनीतील पाण्याचा स्त्राsतही घटत आहे. अनेक कूपनलिका पाण्याअभावी बंद पडत आहेत. यामुळे समस्या वाढतच चालल्या आहेत. पाण्याअभावी पिके करपू लागल्याने शेतकऱयांना मोठय़ा वळीवाची प्रतिक्षा लागली आहे. वाढत्या उन्हामुळे शेती करणेही कठीण बनले आहे. यामुळे उकाडय़ापासून व पाणी टंचाईपासून काही प्रमाणात मुक्त होण्यासाठी वळीवाची गरज असल्याचे मत शेतकऱयातून व्यक्त होत आहे.