|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » सेन्सेक्स 39 हजारांवर

सेन्सेक्स 39 हजारांवर 

 

ऑनलाईन टीम / मुंबई:  जागतिक बाजारांकडून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने जोरदार मुसंडी मारली आहे. सेन्सेक्सने आज सकाळी 134.46 (0.35 टक्के) अंकांच्या वाढीसह 39,040 अशी झेप घेतली आहे. तर निफ्टीनेही 45.85 अंकांच्या वाढीसह 11,736 अशी उत्साहपूर्ण नोंद केली आहे.

आज सकाळी 9 वाजून 19 मिनिटांनी शेअर मार्केटच्या व्यवहारांना सुरुवात झाली. बाजार उघडताच निर्देशांकाने उसळी घेतली. यात आयसीआयसीआय बँक (2.51 टक्के), कोल इंडिया (2.44 टक्के), हीरो मोटोकॉप (1.66 टक्के), वेदांता (1.52 टक्के) आणि एशियन पेंट्स (1.48 टक्के) या कंपन्या निर्देशांक वाढीच्या यादीत पहिल्या पाच क्रमांकावर पाहायला मिळाल्या. तर निफ्टीत कोल इंडिया (2.50 टक्के), आयसीआयसी बँक (2.46 टक्के), इंडियन ऑइल (2.44 टक्के), हीरो मोटोकॉप (1.75 टक्के) आणि एशियन पेंट्स (1.65 टक्के) या कंपन्यांच्या निर्देशांकात वाढ झाली आहे.