|Monday, June 24, 2019
You are here: Home » क्रिडा » विश्वचषकासाठी बांग्लादेशच्या संघाची घोषणा

विश्वचषकासाठी बांग्लादेशच्या संघाची घोषणा 

 

 ऑनलाईन टीम / ढाका :  बांगलादेश क्रिकेट संघाने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आपला 15 सदस्यीस संघ मंगळवारी जाहीर केला आहे. त्यांनी या संघात अबू जायेद या युवा गोलंदाजाला स्थान दिले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जायेदने आपल्या स्वींग गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. त्याने अद्याप एकही वन डे सामना खेळलेला नाही. 2018 च्या आशिया चषक स्पर्धेला मुकलेला मोसाडेक होसैनने बांगलादेश संघात पुनरागमन केले आहे. बांगलादेश संघाचे निवड समिती प्रमुख नाझमुल हसन पापोन यांनी हा संघ जाहीर केला.

बांगलादेशचा संघ पुढीलप्रमाणे ः मश्रफे मोर्ताझा (कर्णधार), शकिब अल हसन (उपकर्णधार), तमीत इक्बाल, महमदुल्लाह, मुश्फीकर रहीम, सौम्या सरकार, लिटन दास, सब्बीर रहमान, मेहिदी हसन, मोहम्मद मिथून, रुबेल होसैन, मुस्ताफिजूर रहमान, मोहम्मद सैफुद्दीन, मोसाडेक होसैन, अबु जायेद.