|Monday, April 22, 2019
You are here: Home » Top News » मशिदीमध्ये महिलांना नमाज पाडण्यास परवानगी मिळावी यासाठी याचीका दाखल

मशिदीमध्ये महिलांना नमाज पाडण्यास परवानगी मिळावी यासाठी याचीका दाखल 

सुप्रिम कोर्टाने केंद्र सरकार, मुस्लिम पर्सनल लॉ बॉर्ड मागितले उत्तर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मशिदीमध्ये महिलांना जाण्यास परवानगी मिळावी याबाबत सुनवाईला सुप्रिम कोर्टाने तयारी दाखवली आहे. कोर्टाने याबाबत आज केंद्र सरकार, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि सेंट्रल वक्फचे काउंसिल यांना उत्तर मागितले आहे. याबाबत पुण्यातील दंपति यास्मिन जुबेर आणि जुबेर अहमद पीरजादे यांनी कोर्टात नोटीस दिली होती. यात म्हणले त्यांनी म्हणले आहे, जमात ए इस्लामी आणि मुजाहिद यांना सोडून महिलांना मशिदीत जाऊन नमाज पाडण्यास परवानगी नाही. त्यांनी मशिदीची व्यवस्था पाहणारे अनेकांकडे याची आधी मागणी केली होती. मात्र, त्यांनी महिलांना मशिदीमध्ये परवानगी नाकारली. सरकार देखील मुस्लिम महिलांना समान अधिकार देण्यास असफल ठरली आहे. त्यामुळे याबाबत आम्ही कोर्टात धाव घेतली.

Related posts: