|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » आझम खान यांच्या वक्तव्यावर रेणुका शहाणे यांचा संताप

आझम खान यांच्या वक्तव्यावर रेणुका शहाणे यांचा संताप 

 

 ऑनलाईन टीम / मुंबई :  जया प्रदा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी रामपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवणारे समाजवादी पार्टीचे उमेदवार आझम खान यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. त्यासोबत अशा व्यक्तीला निवडणुकीचे तिकीट दिले जाऊ नये, असेही म्हटले आहे.

जया प्रदा रामपूरमधून आझम खान यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे एका जाहीर सभेमध्ये आझम खान यांनी भाषण करताना मर्यादा सोडून अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वच स्तरांमधून कडाडून टीका झाली. त्यासोबतच जया प्रदा यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल आझम खान यांच्याविरोधात एफआयआरदेखील दाखल करण्यात आला. या घटनेनंतर रेणुका शहाणे यांनीदेखील या घटनेचा निषेध करत ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे. आझम खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र केवळ एफआयआर दाखल करुन चालणार नाही. प्रत्यक्षात कारवाईदेखील करणं गरजेचं आहे. ही कारवाई नक्की होईल का ? मुळात त्यांना 2019 ची लोकसभा निवडणूक लढविण्याची परवानगीच देता कामा नये’’, असं ट्विट करत रेणुका शहाणे यांनी समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांना टॅग केलं आहे.