|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » ऐन सभेत उमेदवारांना निवडणुकांच्या तारखा आठवेनात

ऐन सभेत उमेदवारांना निवडणुकांच्या तारखा आठवेनात 

 ऑनलाईन टीम / नांदेड :

लोकसभा निवडणुकीचा प्रचाराने चांगलाच जोर धरला आहे. पक्षांचे नेते, उमेदवार व कार्यकर्ते जनतेला मतदान करण्याची विनंती करत आहेत. मतदानाची तारीख सांगून मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. मात्र काँग्रेसचे खासदार व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मतदारांना चक्क दुसऱयाच तारखेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. दुसऱया टप्प्यातील मतदान 18 एप्रिलला होणार आहे, तर अशोक चव्हाण यांनी 19 एप्रिलला पंजाचे बटन दाबण्याचे अवाहन केले.

निवडणूक आणि प्रचार यांची जोरदार तयारी सर्व पक्षांनी सुरु आहे. 11 एप्रिल रोजी देशातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता 18 एप्रिल रोजी दुसऱया टप्प्यातील मतदान होणार आहे. नांदेड लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या आधी अशोक चव्हाण यांचेही भाषण झाले. या भाषणात त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य करत, विरोधकांवर टीका केली. मात्र भाषणाच्या शेवटी चव्हाण मतदानाची तारीखच विसरले आणि त्यांनी भलत्याच दिवशी मतदारांना 19 एप्रिलला मतदान करण्याचे आवाहन केले.