|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » हरिसाल गावातले तांत्रिक प्रश्न सोडवण्याचे तावडेंचे आश्वासन

हरिसाल गावातले तांत्रिक प्रश्न सोडवण्याचे तावडेंचे आश्वासन 

 

ऑनलाईन टीम / मुंबई :  ‘डिजीटल गाव’ अशी ओळख मिळालेल्या हरिसाल या गावाचे सत्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडल्यावर भाजपला जाग आली असून, गावातील तांत्रिक प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.

हरिसाल हे डिजीटल व्हिलेज असल्याची जहिरात सरकारने केली होती. त्यांनी या गावाबद्दलचा व्हिडिओ समोर आणला होता. जाहिरातीत करण्यात आलेले दावे खोटे असल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले होते. त्यामुळे सरकारचा खोटारडेपणा उघड झाल्यामुळे विनोद तावडे यांनी लक्ष घालून हरिसाल मधले तांत्रिक प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन दिले.