|Monday, June 24, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय खेळाडूंच्या दाढीवरून ऋषी कपूर यांच्या ट्विटची चर्चा रंगली

भारतीय खेळाडूंच्या दाढीवरून ऋषी कपूर यांच्या ट्विटची चर्चा रंगली 

 

ऑनलाईन टीम / मुंबई :  आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बीसीसीआयने सोमवारी भारतीय संघाची घोषणा केली. सोशल मीडियावर काल दिवसभर भारताचा वर्ल्ड कप संघ हाच टेंडिग टॉपिक होता. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या संघातील खेळाडूंची दाढीवरून ऋषी कपूर यांनी फिरकी घेतली. यात धोनी मात्र अपवाद आहे. त्यांच्या या एका ट्विटने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली.

त्यांनी 15 खेळाडूंचा एकत्रित फोटो ट्विट केला आणि त्यावर प्रश्न विचारला. त्यांनी लिहीले की,’’आपल्या संघातील अनेक खेळाडूंनी दाढी का ठेवली आहे? ’’ कपूर यांनी शेअर केलेल्या फोटोत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी वगळता सर्व खेळाडूंची दाढी होती. मग काय त्यांच्या या ट्विटरवर चांगलीच चर्चा रंगली.