|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » टिक-टॉक ऍपवर बंदी आणण्याचे आदेश

टिक-टॉक ऍपवर बंदी आणण्याचे आदेश 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

तरुणाईमध्ये सोशल मिडीयात प्रचंड पेझ असणाऱया टिक-टॉक अ‍Ÿपवर बंदी आणण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने मद्रास हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकारने गुगल आणि अ‍Ÿपला प्ले स्टोअरमधून टिकटॉक अ‍Ÿप हटविण्यास सांगितले आहे. सरकारच्या या आदेशानंतर लोकांना आता टिकटॉक अ‍Ÿप डाउनलोड करता येणार नाही. मात्र ज्या लोकांकडे आधीपासून हा अ‍Ÿप आहे त्यांना तो आता पहिल्यासारखा वापरता येणार आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सोमवारी झालेल्या सुप्रीम कोर्टात सुनावणीनंतर हे आदेश देण्यात आले आहेत. टिकटॉक अ‍Ÿप सोशल मिडीयामध्ये तरुणाई प्रसिद्ध अ‍Ÿप आहे. मात्र काही जणांकडून या ऍपचा गैरवापर करण्यात येत असून अश्लिल चित्रफितींना प्रोत्साहन देण्यासाठी टिकटॉकचा वापर करण्यात येतो असा आरोप करत याविरोधात मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. टिकटॉकवर बंदी आणावी अशी याचिकेत मागणी करण्यात आली होती. यावरील सुनावणी दरम्यान मद्रास हायकोर्टाने अ‍Ÿपवर बंदी आणली.