|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » आदित्यनाथांची महाराष्ट्रातील पहिली सभा पैठणला

आदित्यनाथांची महाराष्ट्रातील पहिली सभा पैठणला 

 

 ऑनलाईन टीम / मुंबई :  उत्तर प्रदेश चे योगी आदित्यनाथ यांच्यावर कारवाई करत त्यांना 72 तासांची प्रचारबंदी करण्यात आली आहे. प्रचार बंदी संपल्यावर महराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांच्या तीन सभा होणार आहे. जालना लोकसभा मतदारसंघाचे उमदेवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शुक्रवारी पैठणला जाहीर सभा घेणार आहे. निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ यांच्यावर लावलेली प्रचार बंदी गुरुवारी (ता.18) ला संध्याकाळी चार वाजता संपणार आहे. दुसऱया दिवशी महाराष्ट्रात तीन ठिकाणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा होणार आहेत. त्यापैकी, पहिला सभा जालना लोकसभामतदारसंघातील पैठण येथे होणार आहे.

पैठण येथील खरेदी-विक्री महासंघाच्या मैदानावर शुक्रवारी सकाळी 11 वाजता योगी आदित्यनाथ यांची सभा होणार असून भाजपकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. रावसाहेब दानवे हे सध्या आजारी असल्यामुळे सर्व नियोजन कार्यकर्ते आणि नेत्यांकडे सोपवण्यात आली आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून अर्जुन खोतकर यांनी माघार घेतल्याने काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे आणि युतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्यात थेट लढत होणार आहे.रावसाहेब दानवेंच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांना मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.