|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » राम नवमीला साईचरणी 4 कोटींचे दान

राम नवमीला साईचरणी 4 कोटींचे दान 

 

 शिर्डी/ प्रतिनिधी :  श्री साईबाबा संस्‍थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीच्या वतीने शुक्रवार दिनांक 12 एप्रिल ते दिनांक 15 एप्रिल 2019 या कालावधीत आयोजित केलेल्या श्री रामनवमी उत्सवाम रुपये 04 कोटी 16 लाख इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्‍थानचे उप कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रवींद्र ठाकरे म्हणाले, दिनांक 12 एप्रिल ते 15 एप्रिल 2019 याकालावधीत रोख स्‍वरुपात एकूण रुपये 04 कोटी 16 लाख देणगी प्राप्त झाली असून यामध्‍³ाs दक्षिणापेटी मोजणी रुपये 01 कोटी 92 लाख 76 हजार 527, देणगी काऊंटर 98 लाख 20 हजार 774 रुपये, डेबीट पेडीट कार्ड, ऑनलाईन, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर आदी रुपये 01 कोटी 11 लाख 58 हजार 978 रुपये, सोने 198.400 ग्रॅम रक्कम रुपये 7.61 लाख व चांदी 4102.60 ग्रॅम रक्कम रुपये 1.11 लाख, 14 देशांचे परकिय चलन अंदाजे रुपये 4 लाख 90 हजार 860 यांचा समावेश आहे.

श्री रामनवमी उत्सवाच्या कालावधीत 01 लाख 80 हजार 670 साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला यामध्‍³ाs टाइम बेस, जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन या सेवांचा सामावेश असून ऑनलाईन व सशुल्क दर्शन/आरती पासेसद्वारे 67 लाख 61 हजार 400 रुपये प्राप्त झालेले आहे. तसेच उत्सव कालावधीमध्‍³ाs श्री साईप्रसादालयामध्‍³ाs सुमारे 01 लाख 94 हजार 527 साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेत 01 लाख 95 हजार 400 साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्‍³ाात आले. या कालावधीत 02 लाख 16 हजार 800 प्रसादरुपी लाडू पाकीटांची विक्री करण्‍³ाात आली. तसेच साईप्रसाद निवासस्‍थान, साईबाबा भक्तनिवासस्थान द्वारकामाई निवासस्‍थान, साईआश्रम भक्तनिवास व साईधर्मशाळा येथे 45 हजार 833 साईभक्तांची निवासाची व्यवस्था करण्‍³ाात आली. अतिरिक्त निवास व्यवस्थेकरिता उभारण्‍³ाात आलेल्या मंडपामध्‍³ाs सुमारे 05 हजार साईभक्तांची निवासाची व्यवस्था करण्‍³ाात आली. तसेच साईधर्मशाळा येथे 56 पालख्यांची निवास व्यवस्था करण्‍³ाात आली असल्याचे ठाकरेंनी सांगितले.

याप्रसंगी मुख्यलेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब घोरपडे व प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे उपस्थित होते.