|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » प्रेरणा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश

प्रेरणा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश 

बेळगाव / प्रतिनिधी

हिंदवाडी येथील प्रेरणा पी. यु. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन केले आहे. पहिल्याच बॅचच्या या विद्यार्थ्यांमध्ये विजयालक्ष्मी शानभाग हिने विज्ञान विभागात 567 गुण मिळवून 94.5 टक्के मिळविले आहेत. आकांक्षा पिसे हिने 556 गुण मिळवून 92.67 टक्के मिळविले आहेत. तर नेहा कित्तूर हिने 508 गुण मिळवत 84.68 टक्के संपादन केल्याचे कॉलेजचे व्यवस्थापक अमित वाघटाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पेरणा कॉलेज 2017 पासून सुरू झाले. या कॉलेजने विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन सुरू केले आहे. जेईई, नीट, सीईटी, किशोर विकास प्रोत्साहन योजना यासाठी कॉलेजमध्ये मोफत मार्गदर्शन करण्यात येते. मागील वषी विज्ञान विभागाला 22 तर कॉमर्स विभागाला 6 मुलांनी प्रवेश घेतला होता. याचबरोबर नुकत्याच झालेल्या जेईई मुख्य परीक्षेत अजय पाटील याने 90.78, आकांक्षा पिसे हिने 82.39, विजयालक्ष्मी शानभाग 81.75 तर कार्तिकेय बागेवाडी याने 81.16 टक्के गुण मिळविले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी प्राचार्य चिठ्ठी बाबू, शिवाजी किल्लेकर उपस्थित होते.